
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सैन्यांत चकमक उडाली आहे. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच चार पोलीस जखमी झाले आहेत.
Jammu and Kashmir: Four terrorists neutralised in the encounter with security forces near Ban Toll Plaza in Jammu. Weapons recovered from the site.
(Pic source: J&K Police) https://t.co/Jd7eiSJnmN pic.twitter.com/LqmDejur3u
— ANI (@ANI) November 19, 2020
जम्मू कश्मीरमधील नगरोटा भागात दहशतवादी येणार असल्याची खबर सैन्याला मिळाली होती. तेव्हा सैन्याने या मार्गातील प्रत्येक गाडीची तपासणी करण्यास सुरूवात केली.
CRPF and J&K Police received input about the movement of terrorists from Samba sector towards Nagrota Toll Plaza. They were trapped and eliminated. Total 11 AK-47 rifles have been recovered: Central Reserve Police Force (CRPF) https://t.co/m2KKd9FhJ8
— ANI (@ANI) November 19, 2020
ही तपासणी सुरू असताना पहाटे 5 च्या सुमारास काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला आणि जंगलाकडे पळ काढला. तेव्हा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ही चकमक सुरू असल्याने जम्मू कश्मीरचा महामार्ग बंद करण्यात आला आहे.
चार पोलीस जखमी
जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेचे होते. मृत दहशतवाद्यांपैकी तीन दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत तर चौथ्या दहशतावाद्याचा मृतदेहाचा शोध सुरू आहे. या चकमकीत चार पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. त्यात जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील यांचाही समावेश




























































