सावर्डेत साडेचार हजार किलो गांजा पकडला, एकाला अटक

बेकायदेशीर धंद्यावर कारवाईनंतर रत्नागिरी पोलिसांनी सावर्डे येथे आज रविवारी छापा घालून 4 हजार 525 किलो वजनाचा 90 हजार 500 रूपये किमंतीचा गांजा पकडला.एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सावर्डे येथील आडरेकर मोहल्ल्यात एक इसम गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.माहितीच्या आधारे पोलिस उपअधीक्षक (गृह) आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुलाम महामूद काद्री हा रहात असलेल्या ठिकाणी छापा घातला.गुलाम काद्री याच्याकडे 4 हजार 525 किलो गांजा सापडला.याची किंमत 90 हजार ५०० रूपये आहे.गुलाम काद्री याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.हि कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एस.एल.पाटील,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा आणि त्यांच्या पथकाने केली.अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन तरूण पिढीचे आयुष्य उध्दवस्त होत आहे.त्यामुळेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी अंमली पदार्थाविरूध्द जोरदार मोहिम सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या