रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणी साहिल ताहेर पठाण रा. उस्मानपुरा याने गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अलीम शरीफ शहा याच्याशी त्याची मैत्री झाली. त्याने तुला रेल्वे खात्यात नोकरी पाहिजे असेल तर 40 हजार रुपये लागतील, असे सांगितले.

एसी कोच अ‍ॅसिस्टंट मॅनेजर यासाठी अधिकार्‍यांना बोललो आहे, असे सांगून 20 हजार रुपये त्याच्या एटीएम कार्डवरून डिपॉझिट करायला लावले. त्यानंतर पुन्हा 5 हजार रुपये रोख त्याला दिले. उर्वरित15 हजार रुपये 10 ते 12 दिवसांत देतो, असे सांगितले. 15 दिवसानंतर नोकरीची ऑर्डर येईल, असे त्याने सांगितले. दरम्यान इतर कोणी असतील तर त्यालाही नोकरी लावण्याचे अमिष अलिम शहा याने दाखवले. फिर्यादीचा मित्र अश्पाक युसूफ शेख रा. हमाल गल्ली यालाही त्याने असेच अमिष दिले, मात्र नोकरी लावले नाही आणि पैसे घेऊन फसवणूक केली म्हणून दिलेल्या तक्रारीवरून अलीम शहा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.