चला घडवूया युवारक्षक – युवासेना, रहेजा रुग्णालयाच्या वतीने मोफत सीपीआर प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला हार्ट अॅटॅक आल्यास किंवा पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला वाचविल्यानंतर त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सीपीआर (Cardio- Pulmonary Resuscitation) हे टेक्निक वापरता येते, मात्र रुग्णाला सीपीआर कसा द्यावा, हे बहुतेक जणांना माहिती नसते. त्यामुळे या तंत्राची जास्तीत जास्त तरुणांना माहिती व्हावी, गरजेच्या वेळी रुग्णांचे जीव वाचवावेत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेना माहीम विधानसभा आणि पर्ह्टीस असोसिएट्स एस. एल. रहेजा रुग्णालयाच्या वतीने फ्री सीपीआर ट्रेनिंग – चला घडवूया युवारक्षक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना वर्धापन दिन आणि शिवसेना नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या हस्ते झाले. युवासेना मुंबई समन्वयक अभिषेक पाताडे यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम दादर पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळ येथे पार पडला. यावेळी सर्जिकल इनटेनसिव्ह केअर युनिटचे प्रमुख डॉ. अमित नाबर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक राजू पाटणकर, उपविभाग समन्वयक सूर्यकांत बिर्जे, शाखाप्रमुख चंदू झगडे, शाखाप्रमुख संजय भगत, शाखाप्रमुख विनय आकरे, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, शाखा समन्वयक चंदन साळुंखे, महिला विभाग संघटक आरती किनरे, महिला उपविभाग संघटक वैशाली पाटणकर, शाखा संघटक संजना पाटील उपस्थित होते.

युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, मुंबई समन्वयक जाई सोमण, युवा विभाग अधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, युवती विभाग अधिकारी गुरशीन सहानी, विधानसभा समन्वयक विराज ठाकूर, विधानसभा समन्वयक साईश माने, उपविधानसभा चिटणीस संकल्प गावकर, उपविधानसभा चिटणीस प्रथमेश शिरोडकर, शाखा अधिकारी प्रवीण बाबल, शाखा अधिकारी दिनार पाटील, शाखा अधिकारी रोहित जाधव, शाखा अधिकारी विनायक मिठबावकर, शाखा समन्वयक मनीष आरेकर, शाखा समन्वयक प्रवीण हुले, शाखा समन्वयक सुशांत गोजारे, शाखा समन्वयक सौरभ भगत, शाखा समन्वयक प्रणित खडपे, युवती उपविभाग अधिकारी शामल नांगरे, युवती उपविभाग अधिकारी सृष्टी देवळे, युवती विधानसभा चिटणीस प्राची गावडे, युवती शाखा अधिकारी राजिता वैद्य, युवती शाखा समन्वयक अलिशा गमरे, युवती शाखा समन्वयक किरण सुनगर, विधानसभा सोशल मीडिया समन्वयक महेश जाधव. सोबत युवासैनिक राहुल फटजी, सिद्दार्थ शिवलकर, जीत वीरा, सिद्धांत कुमठेकर, गौरव भगत, केशव साटवे, मयूर शिंदे, साहिल कदम, अमोल जरारे, कुणाल नाईक, शैलेश सावंत, दुतेष रहाटे, गीतांजली मोरजकर हेदेखील उपस्थित होते.