Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘ 8 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, August 8, 2023)
आळस दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. समाजात पतप्रतिष्ठा मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आजचा दिवस सुखासमाधानात घालवाल. श्रद्धा आणि सबुरी हे शब्द लक्षात ठेवा. विरोधकांचा विरोध मावळेल. जोडीदार कौतुक करेल. आरोग्याची काळजी घ्या. कुमारिकांना त्यांच्या आवडीचा पदार्थ घाला.
शुभरंग : पांढरा

वृषभ (TAURUS – Tuesday, August 8, 2023)
छोट्या सहलीला जाण्याचा योग आहे. व्यावसायिकांकरिता आजचा दिवस शुभदायक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कार्यालयात नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल. जोडीदारासोबत निवांत वेळ घालवाल. घरात नवीन शोभेची वस्तू आणा. कलेतील कौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : पिवळा

मिथुन (GEMINI – Tuesday, August 8, 2023)
मनातील चिंता दूर होतील. लोकं तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जवळच्या मित्रमंडळींचा सल्ला ऐकाल. केशरी रंगाचा पोषाख खरेदी करा. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. आर्थिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. घरातील थोरामोठ्यांची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. काटकसर करावी लागेल.
शुभरंग : पिवळा

कर्क (CANCER – Tuesday, August 8, 2023)
नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कुटुंबातील जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या. भगवान शिवाचे दर्शन घ्या. सौंदर्य प्रसाधने आणि दागिन्यांची खरेदी कराल. घरात प्रसन्न वातावरण राहील. जोडीदारासोबत असलेलं नातं मजबूत होईल. घरातील लहान मुलांकडून आनंदाची बातमी कानी पडेल. मेहनतीचे फळ मिळेल.
शुभरंग : लाल

सिंह (LEO – Tuesday, August 8, 2023)
धनप्राप्तीसाठी नव्या मार्गांचा अवलंब कराल. मनातील चिंता दूर होईल. ऋतुमानानुसार दिनचर्येचं पालन करा. शिवपिंडीवर बेलाचे पान वाहा. अनावश्यक पैसे खर्च करणे टाळा. हिवाळ्यात जुने आजार डोकं वर काढू शकतात. त्यामुळे सतर्क राहा. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. अति बोलणे टाळा. इतरांचा विचार करा.
शुभरंग : चॉकलेटी

कन्या (VIRGO – Tuesday, August 8, 2023)
मन उत्साही राहिल. प्रॉपर्टीच्या कामकाजाबाबत बेजबाबदार राहू नका. नोकरीत यश मिळेल. गरिबांना अन्नदान करा. बोलताना शब्दांचा वापर योग्य करा. वरिष्ठ मार्गदर्शन करतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. घरातील फुलदाणीत लाल रंगाची गुलाबाची फुले ठेवा. आवडत्या व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल.
शुभरंग : गुलाबी

तूळ (TULA- Tuesday, August 8, 2023)
अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल. आरोग्य चांगले राहिल. भगवान शंकराचा 108 वेळा नामजप करा. अचानक प्रिय व्यक्तिची भेट होईल. कोर्टाच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखी खरेदी कराल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. मन प्रसन्न ठेवणारी कामे कराल. कलेसाठी कष्ट घ्यावे लागतील.
शुभरंग : क्रिम

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, August 8, 2023)
सावधगिरीने पावले टाकावी लागतील. कागदपत्रांवर सही करण्याआधी काळजीपूर्वक वाचून घ्या. कोणतेही काम अर्धवट सोडू नका. महत्त्वाची कामे मार्गी लावाल. नवीन मित्रमैत्रिणी जोडाल. कार्यक्षमता वाढेल. गुळाचे दान करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. एकाग्रता वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील.
शुभरंग : जांभळा

धनु (SAGITTARIUS – Tuesday, August 8, 2023)
नशिबाची साथ मिळेल. आळसामुळे महत्त्वाची संधी गमावू नका. स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल. वेळेचे व्यवस्थापन केल्यास यश मिळेल. रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबियांची मदत घ्याल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंच्या तब्येतीची विशेष काळजी घ्याल.
शुभरंग : नारिंगी

मकर ( CAPRICORN -Tuesday, August 8, 2023)
कामात यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. अन्नदान करा. हिंमत आणि समजूतदारपणे वागलात तर उपाय नक्कीच सापडेल. आपल्या प्रयत्नांना गती मिळेल. घाईघाईत कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याची जोखीम घेणे टाळा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नवीन दिशा मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
शुभरंग : पोपटी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, August 8, 2023)
आपले काम आणि ध्येयाकडे लक्ष द्या. आपल्या मनातील भावना सगळ्यांसमोर व्यक्त करू नका. कुटुंबियांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. गायीला ताजी पोळी खाऊ घाला. कोणाशीही वादविवाद घालू नका. अति बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दिलेले वचन पाळा. नोकरदारांना आजचा दिवस तणावयुक्त जाऊ शकतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभरंग : पिवळा

मीन (PISCES – Tuesday, August 8, 2023)
रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक करा. आज केलेला प्रवास सुखद आणि लाभदायक होईल. वाचन, लेखनाशी संबंधित कामे करावी लागतील. तरुणांना मौजमजेच्या संधी मिळतील. नोकरीत सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रेमसंबंधांना बळ येईल.
शुभरंग : मोरपिसी