
मेष (ARIES – Tuesday, March 28, 2023)
स्वत:साठी वेळ काढाल. कुटुंबियांना वेळ द्या. भावनांवर नियंत्रण ठेवा. घरातील वातावरण शांततापूर्ण आणि मोहक असेल. डोळ्यांची काळजी घ्याल. आहारात गुलकंदाचा समावेश करा. लोकं तुमच्याकडे सल्ला मागायला येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : नारिंगी
वृषभ (TAURUS – Tuesday, March 28, 2023)
मानसिक शांततेसाठी गणपती अथर्वशीर्ष म्हणा. हिरवे दगड फ्लॉवर पॉटमध्ये ठेवा. सायंकाळी पाहुण्यांसोबत वेळ घालवाल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रिय व्यक्ती मदत करेल. पैशाची आवश्यकता भासू शकते. घरात हिरव्या रंगाची फुलदाणी आणा. बाथरूमध्ये हिरव्या रंगाचे विजेचे दिवे लावा.
शुभरंग : निळा
मिथुन (GEMINI – Tuesday, March 28, 2023)
हातात चांदीचा कडा घाला. घरातील वातावरण सकारात्मक राहिल. मित्रांचा आधार मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी कळेल. तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे आजूबाजूचे लोकंही प्रसन्न राहतील. प्रिय व्यक्तिची भेट होईल. पांढऱ्या रंगाचं सोवळं नेसून पूजा करा.
शुभरंग : काळा
कर्क (CANCER – Tuesday, March 28, 2023)
आराध्य देवतेचे दर्शन घ्या. ऊर्जाशक्ती वाचवून ठेवा. आजचा दिवस आल्हाददायक असेल. स्वत:साठी वेळ काढा. नोकरीतील अडचणी दूर होतील. नवीन कपड्यांची खरेदी करावी लागेल. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये रमून जाल. रिकाम्या वेळी आवडीचे पुस्तक वाचाल. दररोज सकाळी व्यायाम करा.
शुभरंग : खाकी
सिंह (LEO – Tuesday, March 28, 2023)
अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घाला. अतिखाणे टाळा. घरातील लहान-सहान गोष्टींवर पैसे खर्च कराल. नवीन योजना आणि प्रकल्प मार्गी लावाल. दररोज सकाळी हिरव्या गवतावरून चाला. मनमोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी आज वेळ काढाल. आरोग्याची तपासणी करून घ्या.
शुभरंग : राखाडी
कन्या (VIRGO – Tuesday, March 28, 2023)
दूरच्या प्रवासाचा योग आहे. सगळ्यांच्या हिताचा आणि सकारात्मक विचार मनात करा. भागीदारीत फायदा होईल. कुटुंबातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. आजचा दिवस यशस्वीतेचा आहे. आवडता पोषाख परिधान करा. इतरांना गोडधोड खाऊ घालाल. अनपेक्षितपणे घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : राखाडी
तूळ (LIBRA- Tuesday, March 28, 2023)
पूर्ण खात्री झाल्यावरच कोणताही निर्णय घ्याल. संधीचे सोने करा. स्वत:कडे लक्ष द्या. आर्थिक सुबत्ता लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मनमोकळेपणे स्वत:चे मत मांडायला शिका. आवडता पदार्थ खायला मिळेल. उगाचच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका.
शुभरंग : पांढरा
वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, March 28, 2023)
मित्रमैत्रिणींशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतील. महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. नम्रता बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. पिंपळाच्या झाडाला नमस्कार करा. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. प्रवास घडेल. सकारात्मक विचार करा. आवश्यक तेवढेच बोलाल.
शुभरंग : नारिंगी
धनु (SAGITTARIUS – Tuesday, March 28, 2023)
प्रवासाचा विशेष आनंद अनुभवाल. पूर्ण खात्री झाल्यावरच कोणताही निर्णय घ्या. कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी त्याची तयारी करा. हुशारीने काम करत राहा. स्वतछतयारीसह पुढे जा. हुशारीने काम करत राहा. वैयक्तिक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल
शुभरंग : जांभळा
मकर (CAPRICORN – Tuesday, March 28, 2023)
उधारीचा व्यवहार कोणाबरोबर करू नका. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात वरिष्ठांकडून कौतुक होईल. आराध्यदेवतेला प्रार्थना करा. नवीन कपड्यांची खरेदी कराल. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा.
शुभरंग : जांभळा
कुंभ (AQUARIUS – Tuesday, March 28, 2023)
पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालून प्रार्थना करा. जबाबदाऱ्या पार पाडाल. सुख-सौख्य लाभेल. स्वत:साठी वेळ काढा. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. मित्र परिवारात रमाल. आजचा दिवस आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. घरात सुगंधी फुले ठेवा.
शुभरंग : सोनेरी
मीन (PISCES – Tuesday, March 28, 2023)
हाती घेतलेले काम सफलतेने पूर्ण कराल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. चिमण्यांना दाणे खाऊ घाला. परोपकार कराल. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा. प्रिय व्यक्तिची भेट होईल. आराध्यदेवतेची उपासना करा. आवडीचे स्तोत्र म्हणा. मनातली इच्छा पूर्ण होईल.
शुभरंग : गुलाबी