20 रु पेट्रोल, महिलांना मेकअप किट आणि बेवड्यांना रोज एक चपटी; उमेदवाराचा जाहीरनामा व्हायरल

निवडणुका जवळ आल्या की उमेदवारांकडून घोषणांचा पाऊस पडतो. या घोषणांच्या आधारे मते मागितली जातात आणि यातल्या काही घोषणा या चर्चेचा विषय बनतो. सिरसाढ गावात सरपंचपदाची निवडणूक होत असून यासाठी जयकरण लठवाल नावाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी मतदारांना जी आश्वासने दिली आहेत ती पाहून लोकं हडबडली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण बोथरा यांनी लठवाल यांच्या आश्वासनांच्या बॅनरचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून, “मी या गावात राहायला जाणार आहे” असं म्हणतं लाफिंग इमोजी शेअर केला आहे.

जयकरण लठवाल यांनी जी आश्वासने दिली आहेत ती काय आहेत ती पाहूया.

 • रोज सरपंचाचा ‘मन की बात’ कार्यक्रम
 • गावात 3 विमानतळे निर्माण करणार
 • महिलांसाठी मोफत मेकअप किट
 • सिरसाढमध्ये 20 रुपये लिटर पेट्रोल
 • जीएसटी संपवणार
 • 100 रुपये दराने गॅस सिलिंडर देणार
 • प्रत्येक कुटुंबाला एक बाईक मोफत देणार
 • सिरसाढपासून दिल्लीपर्यंत मेट्रो सेवा सुरू करणार
 • भूमिगत विजेची लाईन आणि त्यावरून पाण्याची पाईपलाईन
 • मोफत वायफाय
 • सिरसाढमधल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी
 • बेवड्यांसाठी रोज एक दारूची बाटली
 • सिरसाढपासून गोहानापर्यंत दर ५ मिनिटाला हेलिकॉप्टरची सुविधा

सिरसाढ हे गाव हरयाणात येत असून या गावात सरपंचपदासाठी होणारी निवडणूक जयकरण लठवाल यांच्या जाहीरनाम्यामुळे लोकप्रिय झाली आहे. अरुण बोथरा यांनी केलेल्या ट्विटला 1हजारपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले असून 7500 पेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.