पवईच्या आयआयटीत मोबाईल अॅप बनवण्याचा विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल अॅप कसा बनवायचा याचे शिक्षण घ्यायचे असेल तर तातडीने पवईच्या आयआयटी मुंबईशी संपर्क साधा. आयआयटी मुंबईमध्ये मोबाईल अॅप निर्मितीचा विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रा. कन्नन मोदगल्या हे या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अॅन्ड्रॉईड अॅप बनवण्याचे शिक्षण देण्यासाठी कोटलीन या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. आठ आठवडय़ांच्या या अभ्यासक्रमात दहा ऑडियो-व्हिज्युअल व्याख्यानांचा समावेश असेल. इच्छुक विद्यार्थ्यांना onlinecourses.swayam2.aced.in यावर जाऊन नोंदणी करावी लागेल. यावर फेसबुक, गुगल किंवा मायक्रोसॉफ्टच्या अकाऊंटवरून लॉग-इन करता येईल. यातील कोणतेही अकाऊंट नसेल तर साईन-अप करावे लागेल. त्यानंतर संबंधित कोर्सची निवड करून सबमिट करावे लागेल.