मोटरमनशिवाय धावली मालगाडी, जम्मूच्या कठुआ स्थानकातून थेट गाठले होशियारपूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पठाणकोटच्या दिशेने निघालेली एक मालगाडी ताशी 80 किलोमीटर वेगाने मोटरमनशिवाय जम्मूतील कठुआ रेल्वे स्थानकातून थेट पंजाबमधील होशियारपूरला पोहोचली. या धक्कादायक घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱयांमुळे एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या वेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.

कठुआ रेल्वे स्थानकावर सकाळी साडेसातच्या सुमारास मालगाडी थांबली होती. यादरम्यान काही कामासाठी लोको पायलट खाली उतरला. मात्र रोलडाऊनमुळे मालगाडी अचानक पुढे निघाली आणि गाडीने बघता बघता ताशी 70 ते 80 किलोमीटरचा वेग घेतला. अखेर होशियारपूरजवळील उत्ती बस्सीजवळ ही गाडी थांबविण्यात यश आले.

रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मालगाडीच्या मागे लागलीच अपघात निवारण गाडीही पाठविण्यात आली होती. या रेल्वेगाडीचे एक इंजिन बंद पडले, तर दुसरे इंजिन सुरू होते. मोठय़ा प्रयत्नांनंतर रेल्वे अधिकाऱयांना मालगाडी थांबविण्यात यश आले. हँडब्रेक न लावल्यामुळे सुरू झालेली ही मालगाडी हळूहळू 80 किमी प्रति तास वेगाने धावू लागली होती. तिला थांबवण्यासाठी रेल्वे मार्गात लाकडी ठोकळेही लावण्यात आले होते.