कर्नाटकात भाजपच्या अडचणी वाढल्या; के. एस. ईश्वरप्पा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कर्नाटकात भाजपच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शिवमोगा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर नेते के.एस. ईश्वरप्पा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपा नेत्यांनी ईश्वरप्पा यांची समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला.

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याचे ईश्वरप्पा यांनी सांगितले. 25 ते 30 हजार लोकांचे समर्थन असल्याचे ते म्हणाले. समर्थक घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचेही यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ईश्वरप्पा यांनी भव्य रॅली काढली. दरम्यान, शिवमोगा येथून ईश्वरप्पा यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार राघवेंद्र हे निवडणूक रिंगणात असून काँग्रेसच्या गीता शिवराज कुमार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.