Iran US Israel War – दुबईजवळ कुवेतच्या तेलवाहू जहाजावर इराणचा हल्ला; समुद्रात तेल गळतीची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात आखाती देश होरपळून निघाले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराण जोरदार प्रत्युत्तर देत असून आखातातील अमेरिकन तळांवर निशाणा साधत आहेत. अशातच मंगळवारी दुबई बंदराच्या क्षेत्रात उभ्या असलेल्या कुवेतच्या एका महाकाय तेलवाहू जहाजावर इराणने हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाच्या मुख्य भागाचे नुकसान झाले असून मोठी आग लागली होती. दुबई प्रशासनाने ही आग विझवण्यात यश आल्याचे सांगितले असले तरी मोठ्या प्रमाणात तेल गळती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

इराणने हल्ला केलेल्या जहाजाचे नाव ‘अल-साल्मी’ असे आहे. जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या संबंधित यंत्रणांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिली.

‘अल-साल्मी’ हे जहाज चीनमधील किंगदाओकडे निघाले होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली होती. त्यानंतर ते सौदीच्या खफ्जी बंदरात पोहोचले. तेथून कुवेतच्या ‘मिना अल अहमदी’ बंदरातून पुन्हा माल भरून ते पूर्वेकडे युएईच्या दिशेने रवाना झाले. हे जहाज कुवेतचा ध्वज लावून प्रवास करत होते आणि चीनला तेल पोहोचवणार होते. मात्र दुबईजवळ या जहाजावर इराण हल्ला केला. या हल्ल्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचा इराणवर सर्वात भीषण हल्ला; इस्फहान शहरावर टाकला 2000 पाउंडचा बंकर-बस्टर बॉम्ब, ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ

तेल गळतीचा धोका

इराणने केलेल्या हल्ल्यामध्ये जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या दुबई मीडिया ऑफिस आणि संबंधित पथके जहाजाच्या नुकसानीचा आढावा घेत असून तेल गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

इराणविरुद्धचे युद्ध कधी संपणार? इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली महत्त्वाची माहिती