
सामना ऑनलाईन । मुंबई
पुणे येथील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यात येणार आहे. याविषयीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याविषयीचा अध्यादेश काढण्यात येणार असून विद्यापीठाचे अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतील. रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, संशोधन व विकास आणि नवीन उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता देण्याचे धोरण सरकारचे आहे. याच पार्श्वभूमीवर फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.


























































