फुरसुंगीत टोळक्याचा हातात कोयते घेऊन राडा, तरूणाच्या घराचे केले नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाडीला कट मारल्याच्या रागातून चार ते पाचजणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन तरूणाच्या घराची तोडफोड केली. त्याशिवाय परिसरात दहशत माजवून गोंधळ घातल्याची घटना काल सकाळी दहाच्या सुमारास फुरसुंगीतील हरफळे आळीत घडली. याप्रकरणी सचिन सूर्यवंशी (वय 19) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी सचिनचा भाउ किशोर याने आरोपीच्या गाडीला कट मारल्याचा आरोप करीत टोळके हरफळे आळीत गेले होते. त्यांनी हातात बांबू, कोयते, घेउन किशोरला बाहेर काढा, आज त्याल जिंवत ठेवणार नाही, आम्ही इथले दादा आहोत, जर कोणी भांडणात आले, तर त्याचा फडशा पाडू अशी धमकी दिली.

त्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत माजवून सचिन यांच्या घराची तोडफोड केली. त्यामुळे परिसरातील लोक घाबरून गेले होते. याप्र्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विकास राउत तपास करीत आहेत.