
प्रसिद्ध कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्केझ यांनी त्यांच्या जीवनातील काही रहस्य जनेतपासून लपवून ठेवली होती. अनेक वर्षे जनतेपासून लपवलेली माहिती आता उघडकीस आली आहे. नोबेल पारितोषिक विजेते असलेले मार्केझ यांचे 90 च्या दशकात एका लेखिकेशी प्रेमसंबंध होते. त्या संबंधातून त्यांना मुलगीही झाली होती. तिचे नाव त्यांनी इंदिरा ठेवले होते. याबाबतचे वृत्त रविवारी एका कोलंबियन वृतपत्राने प्रसिद्ध केले. या वृत्ताला मार्केझ यांच्या दोन नातेवाईकांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे मार्केझ यांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबाबतची अज्ञात असलेली माहिती मिळाली आहे.
कोलंबियन वृत्तपत्र एल युनिव्हर्सलने रविवारी मार्केझ यांच्या आयुष्यातील चाहत्यांना अज्ञात असलेले रहस्य प्रकाशित केले. ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ आणि ‘लव्ह इन द टाईम ऑफ टाइम’ यासारख्या कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले मार्केझ नोबेल पारितोषिक विजेते आहेत. एल युनिव्हर्सलने प्रकाशिक केलेले मार्केझ यांच्या रहस्यात सत्यता असून ती माहिती खरी असल्याची पुष्टी मार्केझ यांच्या दोन नातेवाईकांनी केली आहे.
मार्क्वेझ यांचे 2014 मध्ये मेक्सिकोमध्ये निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे लाखो चाहते आले होते. त्यांचे लग्न मर्सिडीज बर्चाशी झाले होते. त्यांना रॉड्रिगो आणि गोन्झालो नावाची दोन मुले आहेत. हे कुटुंब अनेक वर्षे मेक्सिकोमध्ये राहत आहे. मार्केझ यांच्या कौटुंबिक आयुष्याबाबत त्यांच्या चाहत्यांना एवढीच माहिती होती.
मार्केझ यांचे 1990 च्या दशकात लेखका आणि पत्रकार सुसाना केटोसोबत प्रेमसंबंध होते. त्यांना एक मुलगीही होती,अशी माहिती या वृत्तपत्राने दिली आहे. केटो यांनी मार्केझ यांच्यासोबत दोन चित्रपटांच्या लेखनासाठी काम केले होते. तसेच 1996 मध्ये एका मासिकाच्या कथेसाठी मार्केझ यांची केटो यांनी मुलाखतही घेतली होती. 90 च्या दशकात हे दोघे एकत्र आल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांच्या मुलीचे नाव इंदिरा ठेवले. ती आता 30 वर्षांची असून आईचे आडनाव वापरते.
मार्केझ यांची भाची शानी यांनी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताला दुजोरा दिली आहे. आपल्याला चुलत बहीण इंदिराबाबत अनेक वर्षांपासून माहिती होती. मात्र, काकांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती द्यायची नाही, अशी पालकांची सूचना असल्याने आपण याबाबत कोणालाही सांगितले नसल्याने शानी म्हणाल्या. काकांनी इंदिराबाबत कधीही कोणालाच सांगितले नव्हते.
आपण सोशल मीडियाद्वारे इंदिरा केटोच्या संपर्कात आहोत. मात्र, आपण तिला प्रत्यक्षात कधही भेटलो नाही, असे मार्केझ यांचे पुतणे गॅब्रिएल एलिजिओ टोरेस गार्सिया यांनी सांगितले. रॉड्रिगो आणि गोन्झालो यांनी आपण सगळ्यांनी एकदा भेटायला हवे, असे अनेकदा सांगितले. मात्र, ते शक्य झाले नसल्याचेही गॅब्रिएल यांनी सांगितले.
मार्केझ आणि केटो यांच्याबाबत आदर असल्याने त्यांच्या वैयक्तीक आयुष्याबाबत कोणालाही माहिती दिली नसल्याचे मार्केझ यांच्या कुटुंबियांनी सांगितले. तसेच केटो यांनीही इंदिराची वेगळी ओळख निर्माण केली असून इंदिरा केटो यांचेच आडनाव वापरते. इंदिरा मेक्सिकोमधील प्रसिद्ध माहितीपट निर्मात्या आहेत. मार्केझ यांच्या कुटंबियांनी कधीही तिच्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तिच्या आयुष्यात यामुळे काही अडचणी येऊ नयेत, त्यामुळे तिची माहिती दिलेली नाही. तसेच तिने मेहनतीने स्वतःची ओळक निर्माण केल्याचा अभिमान असल्याचेही मार्केझ यांच्या कुटुंबियांनी सांगितले.



























































