गजेंद्र अहिरेंचा ‘डियर मॉली’ तीन भाषांमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॉली’ येत्या 1 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच ‘डिअर मॉली’चे पोस्टर प्रदर्शित झाले असून यामध्ये गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॉयसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत.
पोस्टरमध्ये गुर्बानी गिलच्या हातात पत्र दिसत असून तिचा चेहरा गंभीर दिसत आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा असल्याचे समजते. ‘गुवाहटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘डिअर मॉली’ला ‘बेस्ट फिचर फिल्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सिनेसृष्टीला वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र आहिरे म्हणाले, अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली होती. अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट एका सुंदर आणि हळव्या नात्यावर भाष्य करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. माझे बरेच चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित आहेत.