‘काळाचौकीच्या महागणपती’चा रविवारी पारंपरिक आगमन सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारंपरिक आगमन सोहळा म्हणून प्रसिद्ध असणाऱया काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या महागणपतीचा आगमन सोहळा रविवार, 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता गणसंकुल, लालबाग येथून होणार आहे. या आगमन सोहळय़ाला समाजातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते, गणेशभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध ढोलताशा पथक, कोकणातील पारंपरिक पालखी नाचवणे, महिलांचे लेझीम पथक, दांडपट्टा, लाठीकाठी, तुतारी वाद्य, आदिवासी नृत्य तसेच मुंबईत प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण गावचे कोंबडा, पोपट, मोर नृत्य हे आगमन सोहळय़ाचे प्रमुख आकर्षण असणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमरदीप गोसावी, प्रमुख कार्यवाह अनिल जाधव यांनी दिली.