बिहारमध्ये चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण, तीन नराधमांकडून सामूहिक बलात्कार

GANGRAPE IN BIHAR

बिहारमध्ये एका 19 वर्षीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. नंतर तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बिहारच्या किशनगंज भागात एका 19 वर्षीय तरुणीचे तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत अपहरण केले. तिला निर्जन ठिकाणी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. सर्व आरोपी तरुणीच्या ओळखीचे होते. आरोपी पीडित मुलीच्या घरी यायचे. त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांचे बँक खाते उघडून दिले होते. रविवारी सकाळी तीन नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तीनही नराधमांना अटक केली आहे. मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या