राजीव सातव समर्थक गंगाधर चाभरेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

1704

काँग्रेसचे नांदेड जि. प. चे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर आणि तालुक्यातील पाथरड येथील सरपंच भगवानराव पाथरडकर यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चाभरेकर हे काँग्रेसच्या तिकिटाच्या शर्यतीत होते. माजी खासदार राजीव सातव यांचे ते समर्थक मानले जायचे.

काँग्रेसचे गंगाधर चाभरेकर त्यांना वेळोवेळी चव्हाण गटाने पदासाठी आणि तिकिटासाठी हुलकावणी दिली. यावेळी देखील त्यांचे नाव अंतिम झाले असताना शेवटच्या दिवशी हदगाव विधानसभा मतदारसंघातून माधवराव पवार जवळगावकर यांना काँग्रेसने तिकीट दिले. काँग्रेसने डावलल्यानंतर त्यांनी शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी संपर्क साधला आणि आज सकाळी मातोश्रीवर जाऊन चाभरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.

‘ते’ थोरात तर आम्ही जोरात, काँग्रेस-राष्ट्रवादीचे बारा वाजवणारच; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली

तसेच हदगावातील काँग्रेसचे जुन्या पिढीतील कार्यकर्ते तथा पाथरडचे सरपंच भगवानराव पाथरडकर यांनीही आज शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या दोघांच्या प्रवेशामुळे हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची बाजू आणखीनच भक्कम झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या