
जनरेशन इंडियाने एडब्ल्यूएस री-स्टार्ट कार्यक्रमांतर्गत देशातील दहापेक्षा अधिक शहरांमध्ये मोफत क्लाऊड कॉम्प्युटिंग कौशल्ये विकास आणि नोकरीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी ऍमेझॉन इंटरनेट सर्व्हिसेसला (एआयएसपीएल) सहकार्य करणार असल्याची घोषणा केली आहे. एडब्ल्यूएस री-स्टार्ट हा 12 आठवडय़ांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यात बेरोजगार आणि अल्परोजगारीत व्यक्तींना क्लाऊडची मूलभूत तत्त्वे, एडब्ल्यूएस मुख्य सेवा तसेच करीअरविषयक व्यावहारिक कौशल्ये प्रदान करण्यात येतात. इंडिया डॉट जनरेशन डॉट ओआरजी/प्रोग्राम्स/एडब्ल्यूएस-रीस्टार्ट या वेबसाईटवर या प्रशिक्षणाबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे.


























































