1 मेपर्यंत राज्यात कचरा विलगीकरण प्रक्रिया राबवा,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

617
eknath-shinde

संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. राज्यात सुमारे 53 टक्के कचऱयावर प्रक्रिया होते. आता कचऱयावर 100 टक्के प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट साध्य करताना घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय बृहत् आराखडा तयार करावा आणि कचऱयांचे शास्त्राrय पद्धतीने विलगीकरण सक्तीचे करावे, असे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. त्याचवेळेस 1 मेपर्यंत राज्यात कचरा विलगीकरण प्रक्रिया राबवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात नगरविकास विभागाचा आढावा घेतला. राज्यात नागरिकीकरण वाढले असून संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे.  राज्यात सुमारे 53  टक्के कचऱयावर प्रक्रिया केली जात असून त्याचे उद्दिष्ट 100 टक्के करावे. घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय बृहत् आराखडा तयार करावा आणि घनकचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करावे. सगळय़ाच कचऱयाचे शास्त्राrय पद्धतीने विलगीकरण सक्तीचे करावे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरेही उपस्थित होते. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरण केले. बैठकीस नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतेराज्यात सध्या कचरा विलगीकरणाचे प्रमाण  72  टक्के असून 1 मेपर्यंत त्याचे उद्दिष्ट 100 टक्के करावे.

  • राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार नागरी भागातील 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 2 हजार 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर येणार.
  • प्रत्येक शहरामध्ये नागरी वनीकरण करण्यासाठी ‘अमृतवन’ योजना.
  • स्मार्ट सिटी योजनांच्या कामांना अधिक गती देणार.
  • राज्यात स्वच्छता, पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन यावर भर.
  • विविध महापालिकांनी पदांसंदर्भात जे आकृतिबंध सादर केले आहेत त्यावर तातडीने निर्णय घ्यावा.
  • राज्यातील तीर्थस्थळांच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छतागृहे यासाठी विकास आराखडा तयार होणार.
आपली प्रतिक्रिया द्या