
सामना प्रतिनिधी । नांदेड
सांगवी परिसरात एका घरात रात्री 8 च्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या गॅस स्फोटात 6 जण जखमी झाले आहेत. स्फोटात 3 महिला, 2 पुरुष आणि एक लहान बालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे,उप अधीक्षक अभिजित फस्के यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी त्वरित पोहचले. जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

































































