
गौड सारस्वत क्लबने वेंगसरकर अकादमी संघावर 166 धावांनी दणदणीत विजय मिळवत एकूण 12 संघांचा सहभाग असलेल्या इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी रूबाबात मोहोर उमटवली.
प्रथम फलंदाजी करताना गौड सारस्वत संघाने निर्धारित 40 ओव्हर्समध्ये 4 बाद 298 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी संघाला 40 ओव्हर्समध्ये 9 बाद 132 धावा करता आल्या. अंतिम सामन्यातील शतकवीर आर्यन चव्हाण याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौड सारस्वतच्या काव्या गोरी याची निवड करण्यात आली.
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आर्यन कुमारची तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यासिन सौदागर (दोघेही एजिस फेडरल वेंगसरकर अकादमीचे) यांना गौरविण्यात आले. दिलीप वेंगसरकर, एजिस फेडरलच्या लीग डिपार्टमेंटचे विजय गँगराडे, रवी मांद्रेकर आणि मुंबईच्या 14 वर्षांखालील संघांच्या निवड समितीचे चेअरमन जयप्रकाश जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.




























































