
केरळमधील अब्दुल रेहिम व निवेद अॅन्टॉनी हे गे कपल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

या जोडप्याने लग्नाआधी त्यांचे प्री वेडींग शूट केले आहे. त्यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आम्हाला हे असे फोटो काढून समलैंगिकांचे लग्न देखील इतरांसारखेच सामान्य असते असा संदेश द्यायचा असल्याचे अब्दुल व निवेद यांनी सांगितले.

अब्दुल व रेहिम हे गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच ते बंगळुरू येथे ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत.

























































