
मित्र किंवा नातेवाईकांच्या संपका&त राहण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप हा उत्तम पर्याय आहे. परंतु अनेकदा काही जण युजर्सच्या परवानगीशिवाय ग्रुप बनवून त्यांचा नंबर ग्रुपमध्ये अॅड करतात. अनेकांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे नंबर अॅड झाल्याचे आवडत नाही. अशा युजर्सना सोपी ट्रिक वापरून आपला नंबर हा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अॅड होण्यापासून दूर राहता येऊ शकेल.
- सगळ्यात आधी व्हॉट्सअॅप सुरू करा आणि उजवीकडील वरच्या कोपऱयातील तीन डॉटवर टॅप करा, त्यानंतर सेटिंग्जचा पर्याय निवडून अकाऊंटवर टॅप करा. त्यानंतर प्रायव्हसी ऑप्शनवर जाऊन ग्रुपवर टॅप करा. तेथे युजर्सला ‘Everyone’, ‘My Contacts’ आणि ‘My contacts Except’ हे तीन ऑप्शन दिसतील.
- त्यापैकी ‘Everyone’ ऑप्शनचा अर्थ हा तुमचा नंबर ज्याच्याकडे आहे ती व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय तुमचा नंबर कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये Add करू शकते. तर ‘My Contact’ ऑप्शनचा अर्थ आहे की, तुमचा नंबर त्याच व्यक्तीला ग्रुपमध्ये अॅड करता येईल ज्यांचा फोननंबर हा तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह केला आहे. शेवटी ‘My Contacts Except’ हा ऑप्शन दिलेला असेल. यात तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेल्या नंबरपैकी पुणी तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू नये अशा लोकांची नावे तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे त्या यादीतील लोकांना त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला घेताना परवानगी घ्यावी लागेल.






























































