
येथील एका व्यापाऱ्याची नऊ लाखाची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी ता. 25 रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे.
येथील इंडिया बँके मधुन 9 लाख 15 हजार रोक रक्कम काढुन कापसाचे व्यापारी बळीराम शंभु खरवडे रा.सिरसदेवी हे गेवराई शहरा जवळील प्रदिप जिनिंग येथे कामानिमित्त गेले होते.
सदरिल कँश ही त्यांची बोलेरो गाडी क्र.एमएच 23 ए.डी 9001 मध्ये काळ्या बँग मध्ये ठेवली होती. ते काम आटोपून परत गाडी जवळ आले असता गाडीची काच फुटलेली व बॅग गाडी मधुन गायब होती. बळीराम खरवडे हे कापसाचे व्यापारी असल्याने सदरिल रक्कम त्यांनी शेतकऱ्यांना देण्यासाठी काढली होती. घटना सोमवारी सायंकाळी साडे पाच मिनटांनी घडली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलिस निरिक्षक राजाराम तडवी ,बीट अमलदार उबाळे करत असून, त्यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथक रवाना केले आहेत.

































































