जनार्दन पार्टे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) – शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख, घाटकोपर विधानसभा संघटक जनार्दन पार्टे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने घाटकोपर आणि पोलादपूर येथील पळचिल गावांत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेतर्फे येत्या 18 ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.