मला जन्मालाच का घातलं… मुलीने आईची प्रसूती करणाऱया डॉक्टरला कोर्टात खेचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मला जन्मालाच का घातलं? असं म्हणत एका मुलीने चक्क आपल्या जन्माच्या वेळी आईची प्रसूती केलेल्या डॉक्टरलाच कोर्टात खेचले. महत्त्वाचे म्हणजे मुलगी ही केस जिंकलीसुद्धा.

इव्ही टुम्ब्स असे या मुलीचे नाव असून ती 20 वर्षांची आहे. इव्हीने आपल्या जन्माच्या वेळी आईची प्रसूती करणाऱया आणि आई गरोदरपणात ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होती त्या डॉक्टरविरोधात न्यायालयात दाद मागितली. इव्हीला स्पाईना बिफिडा या मणक्यातल्या आजाराचा त्रास आहे. इव्हीचा दावा आहे की, जर डॉक्टरने आईला वेळीच योग्य सल्ला दिला असता तर तिचा जन्म झाला नसता. इव्हीने दावा केला की, डॉक्टर फिलिप मिशेल यांनी तिच्या आईला फॉलिक ऑसिड सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला असता तर बाळाच्या पाठीच्या कण्यातील दोषाचा धोका कमी झाला असता. जर आईची गर्भधारणा होण्यास उशीर झाला असता तर तिचा जन्म झाला नसता. लंडन उच्च न्यायालयाने नुकसानभरपाई मिळवण्याचा इव्हीचा हक्क स्पष्ट करत निर्णय सुनावला. तिला कोटय़वधींची नुकसानभरपाई मिळाली.