प्रियकरासोबत कुत्र्याप्रमाणे राहते प्रेयसी; गळ्यात पट्टा बांधून हिंडल्यामुळे लोकांनी व्यक्त केले आश्चर्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमात पडलेल्या दोन व्यक्ती एकमेकांसाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. एका प्रेयसीला तिच्या प्रियकरासोबत प्राण्यांप्रमाणे राहायला आवडतं. प्रेयसीच्या विचित्र वागण्यामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याविषयीचा व्हिडियो त्यांनी यूट्यूबवर शेअर केला आहे.

ऑस्टिन, टेक्सास येथे राहणारा बॉयफ्रेंड लोरेन्झो (30) आणि त्याची गर्लफ्रेंड जेनाला (21) तिच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्याप्रमाणे फिरवतो. एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे ती त्याच्यासोबत फिरते. आश्चर्य म्हणजे कुत्र्याच्या भांड्यातच तो तिला अन्न देतो. इतकेच नाही तर ती पलंगावर नव्हे तर पिंजऱ्यात झोपते. ताटात नाही, तर कुत्र्याला अन्न देण्याच्या भांड्यात ती अन्न खाते. ती त्याच्यासोबत फिरायला जात नाही, तर कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा घालून फिरायला जाते आणि प्रियकर तिला कुत्र्याच्या मालकाप्रमाणे वागवतो. त्यानंतर प्रेयसी गुडघ्यावर बसून जीभ हलवत पुढे सरकते. ही अत्यंत आश्चर्यकारक प्रेमकहाणी सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, आता प्रेयसीला गळ्यात पट्टा न घालता कमालीची असुरक्षितता वाटू लागली आहे. प्रेयसीच्या अशा विचित्र वागण्यात प्रियकराचा कोणताही दोष नाही. जेनाने स्वत:च प्रियकरासोबत अशा पद्धतीने राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या प्रेमकहाणीला ‘पपी प्ले’ असे म्हटले जाते. त्यांची ही आगळीवेगळी प्रेमकहाणी

जेना, 21, आणि लोरेन्झो, 30, त्यांच्या प्रेमकथेला ‘पपी प्ले’ म्हणतात. अशा प्रेमकथेमागे काय कथा आहे? जेनाला कुत्र्यासारखे जीवन का जगायचे आहे, यामागे जेनाने सांगितले की, लहानपणापासूनच तिला कुत्र्यांच्या अभिनयाची आवड होती. ती कुत्र्यासारखी दिसणारी ड्रेस घालायची. पण तिला खऱ्या आयुष्यातही कुत्र्यासारखं जगायला आवडेल, असं कोणाला वाटलं असेल. लोकं या जोडप्याच्या कुत्र्याच्या प्रेमाकडे अतिशय विचित्र नजरेने पाहतात आणि ट्रोल करतात, पण जेन्ना म्हणते की, कोणी काहीही म्हणाले तरी मी माझे आयुष्य बदलणार नाही.

जेनाच्या या वागण्यावर तिच्या बॉयफ्रेंड लोरेन्झो म्हणतो की, ज्यांनी हा पिंजरा पहिल्यांदा पाहिला तेव्हा आश्चर्य व्यक्त केले, पण प्रियकराच्या प्रेमापुढे तिला त्याचे काहीच वाटत नाही. जेना लॉरेन्सला तिचा सर्वोत्कृष्ट ‘बॉस’ म्हणते आणि तो माझी खूप काळजी घेतो हे देखील सांगते. म्हणूनच ती त्याची ‘लकी पपी’ आहे.