
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दार्जिलिंग महानगरपालिकेतील गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या 17 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दार्जिलिंग महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आली आहे. ममता बॅनर्जींना हा मोठा धक्का मानला जातो. लोकसभा निवडणुकीतही भाजपने बंगालमध्ये 18 जागांवर विजय मिळवला होता.
17 Councillors of Darjeeling Municipality join Bharatiya Janata Party at Delhi. All 17 Councillors were earlier with Gorkha Janmukti Morcha. pic.twitter.com/lqDjQjMdVo
— ANI (@ANI) June 8, 2019
पक्षाचे सचिव कैलाश विजवर्गीय आणि वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत या 17 नगरसेवकांनी दिल्लीतील भाजपच्या कार्यलयात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मुकुल रॉय म्हणाले की, “दार्जिलिंगमध्ये 32 जागा आहेत त्यापैकी एका सदस्याचा मृत्यू झाला आहे, तर एका सदस्याने राजीनामा दिला आहे. तेव्हा 17 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या महानगरपालिकेवर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे.” तसेच पश्चिम बंगालमध्ये आमचा लोकशाहीसाठी लढा सुरू असल्याचे रॉय म्हणाले.



























































