
जगभरातील हिमनद्या मागील 15 वर्षांच्या तुलनेत सध्या खूप वेगाने वितळत आहेत. त्यांच्या वितळण्याचा वेग एवढा जास्त आहे की, दरवर्षी 31 टक्के बर्फ गायब होत आहे. एका उपग्रहाने हिमनद्यांची थ्रीडी प्रतिमा टिपली आहे. वातावरणातील बदल हा हिमनद्या वितळण्यास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
वैज्ञानिकांनी अलीकडेच 20 वर्षांचा सॅटेलाईट डेटा सर्वांसाठी खुला केला. त्यावरून असं दिसतंय की, जगभरातील दोन लाख 20 हजार हिमनद्या दरवर्षी 328 अब्ज टन इतका बर्फ गमावत आहेत. हिमनद्या वितळल्याने समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे स्वित्झलँडसारखा देश तर सुमारे 24 फूट पाण्याच्या खाली येईल.
हिमनद्या वितळण्याचा दर 2000 ते 2004 या सालादरम्यान 78 अब्ज टन होता. तो 2015 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी वाढत गेलाय. वितळणाऱया सर्वाधिक हिमनद्या अमेरिका आणि कॅनडा येथील आहेत. अलास्का पर्वतरांगांत हिमनद्यांचे वितळणे जगात सर्वाधिक आहे.
नेचर जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार एकीकडे जगभरातील हिमनद्या वितळत असताना तिबेटमधील हिमनद्या जैसे थे आहेत.





























































