
हिंदुस्थानसह जगभरातील अँड्रॉईड युजर्सना अॅप्स वापरताना अडचणी येत आहेत. अॅप्स वारंवार क्रॅश होत आहेत. अँड्रॉईडवर जी-मेल संदर्भात तांत्रिक समस्या उद्भवली आहे. तसेच गुगल पे आणि गुगल क्रोम या अॅप्सवरही परिणाम झाला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती गुगलने दिली. समस्येचे निराकरण होईपर्यंत डेस्कटॉप व्हर्जनचा वापर करावा, अशी शिफारस गुगलने केली आहे. गुगलनं वर्कस्पेस स्टेटस पेजवर ही माहिती दिली आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन अॅप्स पर्याय निवडा. उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. तिथून शो सिस्टम अॅप्स पर्याय निवडा. मग सर्च फॉर अॅड्रॉईड सिस्टम वेबह्यूव क्लिक करा. यानंतर अनइन्स्टॉल अपडेट्स पर्याय निवडा.

























































