Goa Election 2022 : शिवसेनेने जनतेला दिलेला शब्द पाळला, उत्पल पर्रीकरांच्या विरोधातील उमेदवार मागे घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
utpal parrikar sanjay raut

 

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून उभे राहत असल्यास त्याच्या विरोधात उमेदवार देणार नाही असा शब्द शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला होता. उत्पल पर्रीकर यांना भाजपने शेवटपर्यंत पणजीतून तिकीट दिले नाही. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेनेने जनतेला दिलेला शब्द खरा करत पणजी येथील आपला उमेदवार मागे घेतला आहे.

उत्पल पर्रीकर यांना भाजप उमेदवारी देत नसल्याचे वृत्त येताच संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाची बाजू स्पष्ट करत उत्पल यांना समर्थन जाहीर केले होते. तसेच अन्य पक्षांनी देखील अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा द्यावा. हीच दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांना आदरांजली असेल असेही त्यांनी म्हटले होते. त्यानुसार शिवसेनेने पणजी मतदार संघातून आपल्या उमेदवाराला मागे घेतले आहे. शिवसेनेच्या या निर्णयाचे गोव्यातील जनतेने स्वागत केले आहे.