गोवा – तीन महिन्यांपूर्वी ऑर्डर केलेले व्हेंटिलेटर कुठवर पोहोचले? विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

723

48 तासाच्या अंतरात गोव्यात 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी ऑर्डर केलेले व्हेंटिलेटर गेले कुठे असा प्रश्न गोवा फॉरवर्डने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. सरकारकडे केवळ सहा व्हेंटिलेटर आहेत त्याचमुळे पुरेशा उपचाराविना रुग्ण मृत होत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी याच मुद्यावर सरकारचे लक्ष वेधत हल्लाबोल केला आहे.

गोव्यासाठी व्हेंटिलेटरवर मागविले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी 30 मार्च रोजी सांगितले होते. त्यानंतर किती दिवस उलटले त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे का की खनिज वाहतुकीच्या किती ट्रिप्स झाल्या हे मोजता मोजता मुख्यमंत्री ते विसरून गेले?असा प्रश्न कामत यांनी उपस्थित केला आहे.

सध्या गोव्यात कोरोनाचे 14 मृत्यू झाले आहेत. आमचे सरकार लोकांना असेच मरू देणार का? गोव्यातील इतर हॉस्पिटल्स कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित का केली जात नाहीत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली राज्य कार्यकारी समिती काय करते, की त्यांनाही आपल्या बॉस असलेल्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे खनिज व्यवहारातच रुची आहे असा सवाल कामत यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या