खुडीमध्ये एक लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

स्थानिक गुनेहा अन्वेषण विभागाच्या पथकाने खुडी येथे छापा टाकून सुमारे एक लाख रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास केली करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदूर्ग यांना खुडी कावलेवाडी येथील विजय कृष्णा कामतेकर(67) यांनी गोवा बनावटीची दारू विक्री करण्याचा उद्देशाने घराजवळ ठेवली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक एस.सी.आगा, पोलीस उपनिरिक्षक आर.बी.शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.जी.जामसंडेकर, पोलीस कॉन्स्टेबल रवी इंगळे, पोलीस नाईक एस.एस.खाडये यांच्या पथकाने शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कामतेकर यांच्या घरी छापा टाकला. या कारवाईत घराच्या मागील भागात भितीला चिकटवून ठेवलेले गोवा बनावटीच्या दारूचे 20 बॉक्स जप्त करण्यात आले.

यामध्ये चार खाकी बॉक्समध्ये 19,200 रूपये किमतीच्या हनी ब्लेंड दारूच्या 192 बाटल्या, सात खाकी बॉक्समध्ये 33,600 रूपये किमतीच्या बॉबज लेमन कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या 192 बाटल्या, सहा खाकी रंगाच्या पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये 23,800 रूपये किमतीच्या डॉक्टर ब्रँडी कंपनीच्या गोवा बनावटीच्या 288 बाटल्या, दोन खाकी बॉक्समध्ये 9600 रूपये किमतीच्या किंगफिशर कंपनीच्या 48 बाटल्या व एका बॉक्समध्ये 8800 रूपये किमतीच्या मॅकडॉल नंबर 1 कंपनीच्या 44 गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूचे 20 बॉक्स जप्त केले असून बेकायदा दारू विक्री करण्याचा उद्देशाने गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी खुडी कावलेवाडी येथील विजय कृष्णा कामतेकर याच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी देवगड पोलीस तपास करीत आहेत.