गोव्यात कोरोनाचा वेगाने फैलाव, आज नव्याने 112 रुग्ण आढळले

454

गोव्यात आज नव्याने 112 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. वास्को येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा 9 वर पोचला आहे. अजुनही 869 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसागणिक रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत असून कोरोनाचा फैलाव आता गंभीर विषय बनला आहे.

राज्यात आता पर्यंत 2 हजार 151 रुग्ण आढळले असून त्यातील 1 हजार 273 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी नवीन रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे.

वास्को मधील मांगोर हिलमध्ये 64 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत रुग्णांची संख्या 305 वर गेली आहे. हा आकडा वाढत असून कोरोनाचा सामुदायिक प्रसार होताना दिसू लागला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 869 रुग्णांमध्ये मांगोर हिलशी निगडीत रुग्ण सर्वाधिक आहेत.

आज वास्को मधील 50 वर्षीय रुग्णाचा गोमेकॉमध्ये मृत्यू झाला. त्याचा कोविड अहवाल सकारात्मक आला होता. वास्कोमधील आतापर्यंत तिघाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव आता जवळपास राज्यभर झाला आहे. वेर्णा येथील एक औषध निर्मिती करणारी कंपनी तेथील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने बंद करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या