Gold-Silver Price सोन्याच्या दराने रचला इतिहास, चांदीचा भाव 51 हजारांच्या पार

5971

सोन्याच्या भावाने आज इतिहास रचला आहे. एकाच दिवसात मागील सर्व विक्रम मोडीत निघाले असून गुरुवारी सोन्याचा 49 हजार 318 रुपयांवर पोहोचला. सराफा बाजारात मजुरी पकडून हा दर 50 हजारांहून अधिक झाला आहे.

gold-rate1

आज 24 कॅरेट सोन्याचा दरात प्रति तोळा 196 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. बुधवारी बाजार बंद होताना सोन्याचा दर 49 हजार 122 रुपये एवढा होता.

gold

सोन्याप्रमाणे चांदीने देखील ऐतिहासिक उसळी घेतली असून प्रति किलोचा भाव 51 हजार पार गेला आहे. गुरुवारी चांदीच्या दरात 1 हजार 92 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून आता 1 किलो चांदीचा दर 51 हजार 232 रुपये झाला आहे.

gold-jewellery

... म्हणून सोने महागले
कोरोना विषाणूमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या असून जगावर मंदीचे सावट आहे. त्यामुळे लोक शेअर बाजार ऐवजी सोन्यावर पैसा लावत आहेत. बँकेतील व्याज दर कमी होत असल्याने आणि येत्या 2 वर्षात सोन्याचे दर आणखी 20 हजार रुपयांनी महागण्याची शक्यता असल्याने लोकांनी भविष्याचा विचार करून सोन्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या