विस्तीर्ण पसरलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघाच्या कुटुंबाने डेरा टाकलाय. या वाघाच्या कुटुंबाचा व्हीडीओ सध्या वायरल होत आहे.
वीज केंद्राच्या रहिवासी भागाला जोडणाऱय़ा मार्गावर या वाघाच्या कुटुंबाचे सातत्याने दर्शन होत आहे. या भागात वाघीण आणि 3 बछड्यांचा अधिवास आहे. गर्द हिरवाईत सळसळत्या सोनेरी वाघोबा कुटुंबाचे मनोहारी दर्शन या भागातून प्रवास करणाऱय़ा अनेकांना झाले आहे. या कुटुंबाची वस्ती सध्या कोळसा हाताळणी केंद्राच्या आसपास आहे. वनविभागाने आपल्या पथकाच्या माध्यमातून वाघीण-बछड्यांवर नजर ठेवली आहे. धोका लक्षात घेता वन विभागाने स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

























































