रात्री झोपेत चालताना दिसली, सकाळी मृत्यू झाला; अवघ्या 13 वर्षांचा प्रतिभावंत गोल्फपटूचा विचित्र मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमधील लिंकनशायर येथे अवघ्या 13 वर्षांच्या प्रतिभावान गोल्फपटूचा विचित्र मृत्यू झाला. एलेक्सिस ब्राऊन ही 13 वर्षांची प्रतिभावंत गोल्फपटू होती. तिच्या खेळाचे सर्वच कौतुक करत होते. ती चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांना होता. तिला शुक्रवारी थोडी कुकणकुण जाणवत होती. त्या रात्री ती झोपेत चालताना पालकांना दिसली. त्यांनी तिला जागे केले. तिची तब्येत बरी असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी तिला झोपायला सांगितले. त्यानंतर सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे समजले. या प्रतिभावंत गोल्फपटूच्या विचित्र मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

एलेक्सिस ब्राऊन हिने 13 वर्षातच गोल्फमध्ये प्राविण्य मिळवले होते. तिच्या या खेळातील कौशल्यामुळे प्रशिक्षकांना तिच्या चमकदार कामगिरीबाबत विश्वास होता. ती स्वतः उत्तम गोल्फपटू होण्यासाठी मेहनत घेत होती. तिच्या खेळामुळे प्रतिभावान गोल्फर म्हणून ती ओळखली जात होती. ती प्रतिभावान असून या वयात तिचे स्विंगचे कौशल्य थक्क करणारे असल्याचे तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले होते, असे एलेक्सिसच्या वडिलांनी सांगितले.

थोडी कुणकुण जाणवत असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर रात्री ती आम्हाला झोपेत चालताना दिसली , असे तिचे वडील बेन पीटर यांनी सांगितले. शरीरात कुणकुण असल्याने ती झोपत उठली असेल असा विचार करून आम्ही तिला झोपोतून जागे केले. तिची तब्येत बरी असल्याची खात्री पटल्यावर तिला आम्ही झोपण्यास सांगितले, असे तिची आई हेले यांनी सांगितले.

सकाळी आम्ही तिला उठवायला गेला, तेव्हा तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तातडीने आपत्कालीन सेवांची मदत घेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तिच्या अशा जाण्याने धक्का बसल्याचे बेन पीटर आणि हेले यांनी सांगितले. काही तासांपूर्वी झोपेत चालताना दिसणारी मुलगी सकाळी जगातून निघून जाते, यावर विश्वास बसत नसल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या या विचित्र मृत्यूने आम्हाला धक्का बसला आहे.

इंग्लंडच्या महिला गोल्फ संघाकडून खेळण्याचे तिचे स्वप्न होते. एका चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी ती रविवारी आयर्लंडला जाणार होती. मात्र, तिचा अचानक मृत्यू झाला आहे. या स्पर्धेसाठी ती खूप उत्सुक होती. त्यासाठी ती खूप मेहनत घेत होती. ती गोल्फमध्ये नक्कीच चमकदार कामगिरी करेल, असे प्रशिक्षकांनी आम्हाला सांगितले होते. मात्र, अचानक बसलेल्या या धक्कातून सावरणे कठीण असल्याचे पीटर यांनी सांगितले. एलेक्सिससारख्या प्रतिभावंत गोल्फरचा अशा प्रकारच्या मृत्यूने प्रशिक्षकांनाही धक्का बसला आहे. ती आजारी होती किंवा तिला काही त्रास होता, असे काहीही नव्हते. ती तंदुरुस्त असताना तिचा अशाप्रकारे मृत्यू होणे अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.