
गडचिरोली जिल्ह्यांतर्गत गोंडवाना विद्यापीठ पदवीधर मतदारसंघ निवडणुका होत आहेत. यामध्ये चंद्रपूर-गडचिरोली युवासेना व सेक्युलर परिवर्तन पॅनेल यांच्या वतीने संयुक्तरित्या ही निवडणूक लढवली जात असून यामध्ये युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार चंद्रपूर-गडचिरोली युवासेना-शिवसेना अधिकृत उमेदवार म्हणून युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बलखड (खुला प्रवर्ग) व युवासेना सदस्य प्रा. प्रमोद कुचनकर (खुला प्रवर्ग) यांची नावे जाहीर झालेली आहेत. सेक्युलर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांमध्ये खुला प्रवर्ग प्रा. प्रणित भगत, प्रशांत डांगे व राखीव प्रवर्ग ऍड. जगदिप खोब्रागडे, प्रा. राजेश केदार (एसटी), प्रा. संजय बोधे (एनटी), प्रा. अनिल डहाके (ओबीसी), डॉ. पूर्णिमा घोनमोडे (महिला राखीव) या उमेदवारांचा समावेश आहे.
पक्षाकडून सदर निवडणूक ही शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, वासुदेव शडमाक, रियाज शेख, चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे, हर्षल शिंदे, गडचिरोली युवासेना जिल्हाप्रमुख चंदूर बेहरे, दीपक भारसाकडे, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, पप्पू सारवन, जिल्हा चिटणीस विनय धोबे, मनिष जेठानी, युवती सेना जिल्हाप्रमुख उमा चंदेल, पायल गेडाम, तुळजा तलाडे, चंद्रपूर युवती सेना उपजिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, विपशना मेश्राम, शिवकुमारी गोडमल यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात लढविल्या जात असून सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना व शिवसेना अंतर्गत येणाऱया सर्व घटक संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी सेक्युलर परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.



























































