
दरवर्षीप्रमाणे गुगलने यंदाही या वर्षातील सर्वात लोकप्रिय अँड्रॉइड अॅपची यादी जाहीर केली आहे. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या लाखो अॅप्समधून लोकप्रियतेच्या आणि डाऊनलोडस्च्या आधारावर हे अॅप गुगलने निवडले आहेत. ’स्लीप स्टोरीज फॉर काल्म स्लीप -मेडिटेड विथ व्यासा’ हे हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय अॅप ठरले आहे. ’लिजेंड्स ऑफ रुनेतेरा’ हा यावर्षीचा ’बेस्ट गेम’ ठरला आहे. तर फन विभागात ’प्रतिलीपी’ सर्वोत्पृष्ट अॅप ठरले आहे. ’चॉईस अॅप अवॉर्ड’ म्हणून ’मायक्रोसॉफ्ट ऑफीस’ ची तर ’चॉईस गेम ऑफ द इयर’ म्हणून ’वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशीप 3’ ची निवड झाली आहे. ’पर्सनल ग्रोथ’ श्रेणीत ’अपना जॉब सर्च- रोजगार’ या अॅपने बाजी मारली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या