गुगलची करीअर प्रमाणपत्र शिष्यवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगल फॉर इंडियाच्या सातव्या आवृत्तीमध्ये गुगल हिंदुस्थानमधील वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नॅसकॉम फाऊंडेशन, टाटा स्ट्राइव्ह आणि सेफ एज्युकेट यांच्या सहकार्याने गुगल करीअर प्रमाणपत्रांसाठी एक लाख शिष्यवृत्ती सुरू केली. या संस्था देशभरामधील वंचित विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या गुगल करीअर प्रमाणपत्रासाठी मोफत नावनोंदणी करण्याकरिता मदत करतील. आयटी सपोर्ट, ऑटोमेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेटा ऍनालिटिक्स आणि यूएक्स डिझाईन या अभ्यासक्रमांसाठी प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली.