‘मेक स्मॉल स्ट्राँग’, गुगल इंडियाचं नवीन अभियान

तंत्रज्ञान विश्वातली एक अग्रगण्य कंपनी असलेल्या गुगलने आपल्या युजर्सची नेमकी गरज लक्षात घेऊन कायमच नवनवी फीचर्स ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत. आता आपल्या याच युजर्सचा भाग असलेल्या छोटे व्यापारी आणि ग्राहक अशा दोन्ही वर्गांसाठी गुगल इंडियाने एक राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे.

या अभियानांतर्गत दिल्या जाणाऱया फीचर्समुळे ग्राहकांना आपल्या गरजेचे व्यापारी शोधणे अत्यंत सुलभ होणार आहे. या अभियानात गुगल इंडियाने विविध छोटय़ा तंत्रज्ञान कंपन्या, ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱया कंपन्या, विविध मीडिया प्लॅटफॉर्म्स यांना सहभागी करून घेतले आहे.

जुलैमध्ये आलेल्या ‘गुगल कतार’च्या एका रिपोर्टमधील नोंदीवरून गुगलला हे अभियान सुरू करण्याची कल्पना सुचली. या ‘गुगल कतार’च्या रिपोर्टमध्ये सध्या 92 टक्के छोटे व्यापारी हे ग्राहकांच्या कमी झालेल्या संख्येने आणि त्यामुळे विक्रीत झालेल्या कमतरतेने त्रस्त असल्याचे समोर आले. त्याच जोडीला 10 पैकी 4 छोटे व्यापारी एप्रिलपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या मालाच्या विक्रीसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करत होते, तर जुलैपासून डिजिटल माध्यमे वापरणाऱया व्यापाऱयांची संख्या 10 पैकी 5 झाली असल्याचे दिसून आले.

अशा छोटय़ा व्यापाऱयांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहक संख्येत वाढ करून देण्यासाठी गुगलने ‘मेक स्मॉल स्ट्रॉंग’ अभियानाची संकल्पना पुढे आणली. या अभियानांतर्गत नागरिक आपल्या स्थानिक पातळीवरील खरेदीसंदर्भातली आपली मते, खरेदीचा अनुभव, त्यांनी ज्या व्यापाऱयाकडून खरेदी केली त्याच्याबद्दलचा अभिप्राय, मालाचा दर्जा, किंमत या सर्वांबद्दलची मते इतरांशी शेअर करू शकणार आहेत.

त्यामुळे स्थानिक व्यापाऱयांची आपोआपच जाहिरात होऊन त्यांना फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर डिजिटल माध्यमांचा व्यापार करणाऱया विविध ग्राहकांना आपल्या स्थानिक पातळीवरील विविध व्यापाऱयांची व त्यांच्या दर्जाची माहिती घरबसल्या मिळवता येणार आहे. र्यी सगळ्याबरोबरच गुगल आता दूरदर्शनच्या मदतीने ‘नमस्ते डिजिटल’ हा नवा टीव्ही शोदेखील घेऊन येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या