गुगलची नोकरी सोडून विकतोय समोसे-कचोरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक तरुणांचे गुगलसारख्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. परंतु एका तरुणाने रिस्क घेऊन चक्क लाखो रुपयांचे पॅकेज असलेल्या गुगलच्या नोकरीला रामराम ठोकत समोसे – कचोरी विक्रीचा धंदा थाटला आहे. सध्या ह्या धंद्यामधून तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

मुनाफ कपाडिया असे ह्या मुंबईकर तरुणाचे नाव असून तो गुगलमध्ये अकाऊंट स्टॅटर्जिस्ट या पदावर कार्यरत होता. मसुरी, हैदराबादनंतर सध्या त्याची बदली मुंबईत झाली होती. नोकरी सुरू असताना त्याने टीबीके नावाने ऑनलाईन फूड डिलीव्हरीचा व्यवसाय सुरू केला.

त्याद्वारे त्याने आईच्या मदतीने बोहरी जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचविले. तिथूनच त्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यालादेखील धंद्यात फटका बसला. त्याने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. एकेदिवशी त्याची स्टोरी फोर्ब्ज इंडियाने छापली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. पुन्हा जोमाने त्याने कामाला सुरुवात केली. त्याने समोसे, कचोरी सोबत चिकन, मटनच्या अनेक डिशेस बनवायला सुरुवात केली. त्याचा वार्षिक नफा 50 लाखांच्या घरात आहे.