गुगल मॅप्सच रस्ता भरकटले!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्ली कोणताही पत्ता शोधायचा म्हटलं की सगळ्यांची पहिली पसंती असते ती गुगल मॅप्सला. मात्र लोकांना अचूक पत्ता दाखवणारे गुगल मॅप्सच भरकटले तर…ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी गुरुवारी रात्री हजारो युजर्सना याचा प्रत्यय आला आहे. झाले असे की, हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 9.30 च्या सुमारास गुगल मॅप्स हे अॅप व्रॅश झाले. त्यामुळे युजर्सना हे अॅप वापरता येत नसल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली. युजर्सना रस्ता शोधण्यात अडचणी येत होत्या.

यासंदर्भात गुगल मॅप्सच्या वेबसाईटनेही एक निवेदन जारी करून सर्व्हरमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले आहे. परंतु गुगल मॅप्स व्रॅश झाल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. एकटय़ा अमेरिकेतून 12 हजार तक्रारी आल्या आहेत. काहींनी गुगल मॅपला पर्याय म्हणून अॅपल मॅप्स हे अॅप डाऊनलोड केले. ‘मी एका ठिकाणी जात असतानाच अचानक गुगल मॅप बंद झाले. सुदैवाने माझ्याकडे अॅपल मॅप असल्याने माझा नाहक त्रास वाचला’, असा अनुभव एका युजरने शेअर केला आहे.