आपला नवा ‘पिक्सेल’ हा हॅण्डसेट कुणी हॅक करूच शकणार नाही याची गॅरंटी असलेल्या गुगल कंपनीने हा फोन हॅक करून दाखवणाऱ्याला 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 10 कोटी 76 लाखांचे इनाम ठेवले आहे. गुगलनेच याबाबतची माहिती आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.
या फोनमध्ये त्यांनी ‘टायटन-एम’ ही एक खास प्रकारची सिक्युरीटी चीप बसवली आहे. त्यामुळे हा फोन कुणी हॅक करू शकणार नाही असा कंपनीला विश्वास आहे. ही चीप स्मार्टफोनला सुरक्षा देण्याचे काम करते. तीच या फोनमध्ये इनबिल्ट आहे. हा फोन कुणी हॅक केला तर आम्हाला या फोनमधील त्रुटी समजतील आणि आम्ही त्या दूर करू, यासाठीच आम्ही हे बक्षीस ठेवले आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

























































