मुंबईकरांसाठी शिवसेनेची वचनपूर्ती, गिरगाव चौपाटीवरील नाटय़ विश्व संग्रहालयासाठी पुढचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटय़सृष्टीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारे भव्य ‘नाटय़ विश्व संग्रहालय’ पालिका गिरगाव चौपाटीजवळच्या बिर्ला क्रीडा पेंद्र येथे उभारणार आहे. यासाठी 130 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून पावसाळा वगळता एकूण 27 महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे शिवसेनेची मुंबईकरांसाठी आणखी एक वचनपूर्ती ठरणार आहे.

शिवसेनेने पालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मराठी रंगभूमी दालन उभारण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार शिवसेनेने रंगभूमी दालनासाठी पाठपुरावा केला. या पार्श्वभूमीवर पालिकेने या रंगभूमी दालनासाठी पहिले पाऊल टाकले आहे. हे काम दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यासाठी 198 कोटी आणि दुसर्या टप्प्यासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेने अर्थसंकल्पात यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गिरगाव चौपटीवरील बिर्ला कला पेंद्राच्या सध्याच्या इमारतीच्या जागी नवी इमारत उभारली जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी एकूण 130 कोटी 67 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत.

असे होणार काम
 नाटय़ विश्व संग्रहालयाची इमारत चार मजली राहणार आहे. शिवाय दोन मजल्यांचे तळघरही असेल. या ठिकाणी वाहनांच्या पार्पिंगचीही सुविधा या संग्रहालयासाठी सर्व खर्च सरकारकडून करण्यात येणार असून पालिका फक्त हे दालन उभारणीचे काम करणार आहे.  रंगभूमीचा इतिहास आजच्या पिढीला समजण्यासाठी आणि नाटय़क्षेत्राच्या गौरवासाठी हे दालन उभारण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास या दालनात मांडला जाईल. शिवाय रंगभूमीची स्थित्यंतरे अनुभवायला मिळणार आहेत.