
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देवगिरी बंगला न सोडल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फ्लॅटमध्ये राहावे लागत असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपण बंगला कधीच सोडला असल्याचा खुलासा केला आहे.
नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतरही भाजपच्या माजी मंत्र्यांकडून सरकारी निवासस्थान सोडण्यात आले नव्हते. नवीन सरकार पडेल या आशेवर सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून बंगल्याची मुदत वाढवून घेण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली होती. याला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी आपण बंगल्यात वाढीव कालावधीत राहण्यासाठी रीतसर परवानगी मागितली होती. त्याचप्रमाणे त्यानंतर बंगलाही सोडला होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.



























































