ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या काव्यगीतांची स्वरमैफल, विलेपार्ल्यात रंगला शब्दसुरांचा सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कवी ग्रेस आणि आरती प्रभू या द्वयीच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मंतरलेल्या शब्दबनात’ ही काव्यमैफल विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात झाली. या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून झाला. विनय परांजपे यांची संहिता या कार्यक्रमाला लाभली. सुसंवादक विघ्नेश जोशी यांनी कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या निवडक कवितांचे सादरीकरण केले. लोकप्रिय गायक नचिकेत देसाई आणि धनश्री देशपांडे यांनी सादर केलेल्या कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या निवडक गीतांनी कार्यक्रमाला सुरेल रंगत आणली. प्रशांत लळित यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले. अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संचालक श्रीराम पांडे, मिलिंद बिर्जे यांचे कार्यक्रमाला सहाय्य लाभले. संचालनालयाचे अजय पाटील आणि स्मृतिगंधचे अमित टिल्लू यांच्या हस्ते आरती प्रभू आणि ग्रेस यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली.