अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा भव्य पुतळा अंदमानच्या बियोदनाबाद येथे उभारण्यात आला आहे. ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर ऐतिहासिक गीताला 115 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित् य साधून हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.