मोबाईल टॉवर लागला पण रस्ता आला नाही, गुढे गावची अजब कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चिपळूण

गुहागर-चिपळूण रस्त्यावरून 20 किलोमीटर आत गेल्यानंतर असलेल्या गुढे गावातील नागरीक पक्क्या रस्त्यासाठी सगळे प्रयत्न करून दमले आहेत. आश्चर्याची बाब ही आहे या गावामध्ये मोबाईलचा टॉवरदेखील आला आहे मात्र पक्का रस्ता काही झाला नाहीये. या गावाला जाण्यासाठी आजही मातीच्या कच्च्या रस्त्यावरूनच जावे लागते. आम्हाला अच्छे दिन केव्हा येतील असा प्रश्न गुढेवासी सरकारला विचारत आहेत.

गुढे गाव हे आडवाटेवरचे आणि थोडासा डोंगराळ भाग असलेल्या ठिकाणी आहे. इथल्या गावकऱ्यांना कोणत्याही लहानसहान गोष्टीसाठी मार्गताम्हाणेला यावं लागतं. गावात कोणी आजारी असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याच्या नातेवाईकांच्या पोटात गोळा आलेला असतो. रस्त्यावरील खड्डे, कच्च्या मातीचा रस्ता यामुळे गावामध्ये खासगी वाहनचालक यायला तयार होत नाही. जर कोणी तयार झाला तर तो वाट्टेल ते भाडे आकारतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

हा रस्ता गुढे गावाव्यतिरिक्त उभरोली, शिरवली,डुगवे या गावांनाही जोडणारा रस्ता आहे. या सगळ्या गावातील रहिवासी खराब रस्त्यामुळे हैराण झालेले आहेत. पक्क्या रस्त्यासाठई अनेकदा विनंती करूनही त्याचा फायदा न झाल्याने इथले रहिवासी आंदोलनचा पवित्र्यात आहे. आमची मागणी फक्त चांगल्या रस्त्याची आहे तीही जर पूर्ण होत नसेल तर मग आमच्यासमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असं गुढे गावातील एका ग्रामस्थाने म्हटले आहे.